Domestic

Domestic, Spiritual

अष्टविनायक यात्रा – महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय गणेश दर्शन टूर

गणपती हे बुद्धीचे देवता आणि सर्वांचे लाडके दैवत. महाराष्ट्रातील आठ पवित्र गणेश स्थळांना मिळून अष्टविनायक असे म्हटले जाते. ही मंदिरे अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी वसलेली असून पुण्याच्या आसपास पसरलेली आहेत.अशी ही पवित्र यात्रा केल्याने मन प्रसन्न होते आणि आध्यात्मिक उर्जा प्राप्त होते. https://spacesarathitours.com/wp-content/uploads/2025/11/Asthvinayak.mp4 ⭐ दिवस 1 – चार प्रमुख गणेश दर्शन ✨ पहाटे Karad/Satara येथून प्रस्थान(वेळापत्रक – कराड दत्त चौक 5:00, सातारा वाठे फाटा 6:30 – 🛕 1) मयूरेश्वर – मोरगाव अष्टविनायक यात्रा येथे सुरू करण्याची परंपरा. 🛕 2) सिद्धिविनायक – सिद्धटेक भीमा नदीकाठी वसलेले अत्यंत शांत आणि पवित्र स्थान. 🛕 3) चिंतामणी – थेऊर चिंता दूर करणाऱ्या चिंतामणी गणेशाचे दर्शन. 🛕 4) महागणपति – राजनगाव दैत्य वृतासुराचा वध करणाऱ्या महागणपतीचे स्थान. ⭐ दिवस 2 – उर्वरित चार गणेश दर्शन 🛕 5) विघ्नहर – ओझर सूंदर वास्तू आणि प्रसादासाठी प्रसिद्ध. 🛕 6) गिरिजात्मज – लेण्याद्री गिरीवर वसलेले, लेण्यांत कोरलेले अद्वितीय मंदिर. 🛕 7) वरदविनायक – महड इच्छापूर्ती विनायक म्हणून प्रसिद्ध. 🛕 8) बल्लाळेश्वर – पाली भगवंताने भक्त बल्लाळाच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्थापन केलेले स्थान. 💰 एक व्यक्तीची किंमत कराड / सातारा : ₹3,500/- बुकिंग अ‍ॅडव्हान्स : ₹1,000/- (नॉन-रिफंडेबल) ✔️ पॅकेजमध्ये समाविष्ट सुविधा चहा – नाश्ता – शुद्ध शाकाहारी जेवण पहिल्या दिवशी रात्रीचे महाप्रसाद – ओझर येथे मुक्काम – ओझर किंवा लेण्याद्री भक्तनिवास (4 ते 5 जण प्रति खोली – Non-AC) Non-AC मिनी बस 20 सीटर प्रवास पार्किंग, टोल, परवाने, टॅक्स समाविष्ट ⚠️ यात्रा नियमावली सर्व आठ गणपतींचे दर्शन निश्चित यात्रा कराडहून सुरू होऊन कराड येथेच संपणार हॉस्पिटल खर्च वैयक्तिक नैसर्गिक आपत्तीमुळे वेळापत्रकात बदल शक्य बसमध्ये सीट फिक्स करण्यास मनाई मूळ आधारकार्ड आवश्यक मौल्यवान वस्तू आणू नयेत मुलांकरिता विशेष शुल्क नियम (5 वर्षांपर्यंत मोफत) 📞 बुकिंगसाठी संपर्क संतोष नांगरे पाटील: 9822234849 / 8007972139प्रदीप पवार: 9527577800 / 9284648080 📍 कराड – Shree Shailya Residency, Kolhapur Naka📍 पुणे – 699/2 Pravin Chambers, Shiv Sena Bhavan जवळ, Deccan Gymkhana बुकिंग साठी संपर्क करा

Domestic

गुजरात टूर 2025 – इतिहास, संस्कृती आणि निसर्ग अनुभवण्याची सुवर्णसंधी

स्पेस सारथी टूर्स प्रस्तुत गुजरात दर्शन – ९ रात्री १० दिवसांची अविस्मरणीय सहल अहमदाबाद ▪ वडोदरा ▪ स्टॅच्यू ऑफ युनिटी ▪ कुबेर भंडारी ▪ द्वारका ▪ बेट द्वारका ▪ नागेश्वर ▪ सोमनाथ ▪ गिरनार ▪ सासनगिर ▪ पोरबंदर 📅 सहलीचे दिवसनिहाय सुंदर वर्णन पहिला दिवस – आपल्या शहरातून मुंबईकडे प्रस्थान कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे येथून CSMT मुंबईकडे प्रस्थान.त्यानंतर मुंबई–एकतानगर रेल्वे प्रवास.(रेल्वेमधील भोजन समाविष्ट नाही) दुसरा दिवस – भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि कुबेर भंडारी सकाळी एकतानगर स्टेशन – हॉटेल – फ्रेश होऊन➡ स्टॅच्यू ऑफ युनिटी: 182 मीटर उंच जगातील सर्वात उंच पुतळा.➡ कुबेर भंडारी मंदिर: नर्मदा किनारी असलेले 2500 वर्ष जुने मंदिर.➡ नीलकंठ धाम: नर्मदा किनाऱ्यावर वसलेले भव्य मंदिर.हॉटेल मुक्काम – वडोदरा. तिसरा दिवस – लक्ष्मी विलास पॅलेस, साबरमती आश्रम आणि अक्षरधाम ➡ लक्ष्मी विलास पॅलेस – भारतातील सर्वात सुंदर राजवाड्यांपैकी एक.➡ साबरमती आश्रम – महात्मा गांधींचे स्मारक व आश्रम.➡ अक्षरधाम मंदिर – स्वामीनारायण परंपरेतील भव्य वास्तू.हॉटेल मुक्काम – अहमदाबाद. चौथा दिवस – मोढेरा सूर्य मंदिर आणि राणी की वाव ➡ मोढेरा सूर्य मंदिर – भगवान रामाने केलेल्या यज्ञाशी जोडलेली कथा.➡ राणी की वाव – UNESCO जागतिक वारसा स्थळ, नवीन ₹100 नोटवरील छायाचित्र याच वावचे.रात्री – द्वारका कडे प्रस्थान (बस/ट्रेन). पाचवा दिवस – द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका आणि नागेश्वर दर्शन सकाळी द्वारका मुक्काम – फ्रेश होऊन➡ द्वारकाधीश मंदिर – चारधामांपैकी एक.➡ बेट द्वारका – श्रीकृष्णाचे निवासस्थान (बोट खर्च समाविष्ट नाही).➡ नागेश्वर ज्योतिर्लिंगहॉटेल मुक्काम – द्वारका. सहावा दिवस – सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन द्वारकाहून सोमनाथकडे (250 किमी)➡ सोमनाथ मंदिर – बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक.स्थळदर्शन – लाइट & साऊंड शो (इच्छेनुसार).हॉटेल मुक्काम – सोमनाथ. सातवा दिवस – गिरनार, दत्त पदुका आणि सासनगिर सफारी ➡ गिरनार – 10,000 पायऱ्या किंवा दोली/रोपवेची पर्यायी सोय.➡ दत्त पदुका दर्शन➡ सासनगिर जंगल सफारी – आशियाई सिंहांचे एकमेव अभयारण्यहॉटेल मुक्काम – गिरनार. (सफारी तिकिटे समाविष्ट नाहीत) आठवा दिवस – पोरबंदर दर्शन ➡ पोरबंदर – महात्मा गांधींचे जन्मस्थानसंध्याकाळी पोरबंदर–दादर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान. नववा दिवस – दादर आगमन आणि आपल्या शहराकडे प्रस्थान दादर – महालक्ष्मी ट्रेन – पुणे/सातारा/कराड/सांगली/कोल्हापूरकडे प्रवास. दहावा दिवस – घरी आगमन सकाळी कराड येथे सहलीची सांगता.थकवा नाही – फक्त सुंदर आठवणी! ✨ का बुक कराल ही सहल? ● आरामदायी प्रवास, अनुभवी टीम, उत्तम भोजन, सुरक्षित व्यवस्थापन● भक्ती + इतिहास + निसर्ग असे तीनही अनुभव एका सहलीत● कुटुंबासोबत जाण्यासाठी उत्तम – कमी थकवा, जास्त आनंद● सर्व प्रमुख स्थळांचे व्यवस्थित नियोजन● महाराष्ट्रातून आपल्या शहरातूनच प्रस्थान – कोणतीही धावपळ नाही 💰 सहल खर्च (प्रत्येकी) ✔ ₹22,800/- (3 AC रेल्वे प्रवास)✔ ₹20,800/- (Non-AC रेल्वे प्रवास)✔ आगाऊ बुकिंग: ₹7,000 / ₹5,000 🟢 सहलीत समाविष्ट: ● सर्व भोजन – चहा, नाश्ता, दुपारचे/रात्रीचे जेवण (मराठी चव)● आरामदायी बस/हॉटेल व्यवस्था● 20 लिटर पाणी जार● अनुभवी टूर मॅनेजमेंट टीम● सर्व मंदिर/स्थळांचे दर्शन नियोजन 🔴 समाविष्ट नाही: ● बेट द्वारका बोट● सासनगिर सफारी तिकिटे● रोपवे/डोली● स्थानिक रिक्षा/टॅक्सी● रेल्वे/विमान प्रवासातील भोजन 📞 बुकिंग आणि माहिती संतोष पाटील: 9822234849 / 8007972139प्रदीप पवार: 9527577800 / 9284648080 (पत्ता: श्री शैल्या रेसिडेन्सी, कोल्हापूर नाका, मलकापूर, कराड)  

Scroll to Top